आम्ही मार्केटचा अभ्यास केला का लोकांना अशा अडचणीचा सामना करावा लागतो, आज असंख्य लोक आहेत ज्यांना वैयक्तिक, प्रोफेशनल, व्यवसायिक, करियर, आणि नातेसंबंधामध्ये अडचण जाणवत आहेत. पण बऱ्याच कंपनी यावर काम करतात त्यांचे अडचणी देखील सोडवतात पण त्यांचे हे सोल्युशन हे सर्वसामान्य व्यक्तींना परवडणारे नाही जसे वैयक्तिक आणि प्रोफेशनल अडचणी येत असतील जसे की वय वर्ष ३० ते ३५ नंतर बरीच मंडळी स्वतःचे पॅशन शोधत असतात त्यांना स्वतःचं काहीतरी सुरू करायचं असतं पण अशा वेळेस ती गोंधळलेले असतात आणि या लोकांना समुपदेशन आणि ट्रेनिंग साठी भरमसाठ खर्च करावा लागतो जे सर्वसामान्य व्यक्तींना परवडणारे नाही.
पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्विसेस ही काऊनसेलिंग, कन्सल्टींग आणि ट्रेनिंग क्षेत्रातील महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था आहे. दिनांक १ मे २०१९ रोजी पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्विसेस ची स्थापना करण्यात आली. लोकांना आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यास सक्षम करणे हे कंपनीचे मूळ उद्देश्य आहे आणि आत्तापर्यंत 10000 + पेक्षा जास्त लोकांना त्यांच्या जीवनात आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यास सक्षम करण्यास आम्ही यशस्वी झालो आहोत. पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्विसेस ची सुरुवात करताना एक विचार मनात होता कि आनंदी आणि यशस्वी जीवन हे एकत्र जगणं सहजासहजी शक्य नाही पण असे काय करू शकतो ? की लोकाना आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यास आपण त्यांना सक्षम कसे बनवू शकतो.
त्यासोबत व्यावसायिकांच्या व्यवसायातील अडचणी असतात त्यामुळे बऱ्याच वेळा व्यावसायिकांची प्रगती थांबते आणि अडचणी वाढत असतात या अडचणींवर सोल्युशन म्हणजे समुपदेशन आणि ट्रेनिंग याची कॉस्ट उद्योजकांना परवडणारी नसते आणि त्यांना असणाऱ्या अडचणीचे सोलुशन हे ट्रेनिंग मधून किंवा समुपदेशन मधून दिल्या जातं पण त्या अडचणी लवकर सोडविल्या जात नाही आणि त्याची किंमत ही खूप असते. आज पालक विद्यार्थी समुपदेशन करून विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये नातेसंबंधांमध्ये गोडवा आणून त्यांच्या भविष्यामध्ये करियरची स्पष्टता दिली जाते. पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्विसेसचे व्हिजन आहे प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या जीवनाचा सखोल अर्थ आवड पॅशन शोधण्यास लोकांना प्रवृत्त करणे जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या जीवनाचा अर्थ शोधला त्याची आवड किंवा पॅशन जर शोधले तर तो व्यक्ती आनंदी आणि यशस्वी आयुष्य नक्कीच जगू शकतो आणि हीच आमची प्राथमिकता आहे.